| कर्जत | वार्ताहर |
कर्जत- कशेळे रोड वरील धारप फार्म येथे पेज नदीमध्ये एक व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे अशी माहिती कर्जत पोलीस ठाण्यातून रक्षा सामाजिक विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आली. त्यांनी तो मृतदेह बाहेर काढण्यासाठ रक्षा सामाजिक विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांना ते शव बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे असे कळवले.
घटनेची माहिती मिळताच अमित गुरव यांनी निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांच्याशी संपर्क साधून, तहसीलदार ऑफिस येथून जीवरक्षक साहित्य घेतले व कर्जत मधून रिकव्हरी व रेस्क्यू टीमचे मेंबर अक्षय गुप्ता, व्यंकटेश ठाकरे पोसरी येथून संकेत कडू व मांडवणे येथून ऋषिकेश कोळंबे रक्षा संस्थेकडील टॉर्च व दोर घेऊन घटनास्थळी दाखल झाले. खरंतर हा दिवस गौरी विसर्जन व लाडक्या बाप्पाचे विसर्जनाचा होता, सदर टीम मेंबर आपल्या घरचे श्री गणेशाचे विसर्जन अर्धवट सोडून सामाजिक बांधिलकी म्हणून या ठिकाणी कमीत कमी वेळेत तत्परतेने हजर झाले होते. दरम्यान पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अंधार लवकर होण्याची शक्यता होती व झाले ही तसेच, मृत व्यक्तीचे शव नदीतून बाहेर काढत असताना अंधार झाला होता.
नदीतील पाण्याचा अंदाज नसल्यामुळे लाइफ जॅकेट व दोराचा आधार घेऊन, टॉर्च च्या उजेडात अक्षय गुप्ता व संकेत कडू यांनी त्या व्यक्तीचे शव पाण्यातून बाहेर काढले. घटनास्थळी आधीपासूनच उपस्थित असलेले कर्जत पोलीस स्टेशन येथील राजेंद्र दुसाने यांच्याकडे ते शव सुपूर्त केले. मिळालेल्या माहितीनुसार शव मिळालेल्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही. पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण नवले पुढील तपास करीत आहे.
सदर घटनेमध्ये कर्जत येथील निवासी तहसीलदार सचिन राऊत कर्जत पोलीस ठाण्याचे राजेंद्र दुसाने, संतोष साळुंखे, अविनाश पोळ, गिरी, रक्षा सामाजिक विकास मंडळाचे अक्षय गुप्ता, संकेत कडू, ऋषिकेश कोळंबे व्यंकटेश ठाकरे, सुमित गुरव यांचे मोलाचे काम केले.







