| अलिबाग | प्रतिनिधी |
गणेशोत्सव हा आनंद, एकता आणि संस्कृतीचा संगम आहे. या विचारातून होली चाईल्ड सीबीएसई स्कूलमध्ये गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. गणेशोत्सव हा उत्साहपूर्ण आणि आनंददायी सोहळा होता, ज्यात विघ्नहर्ता व बुद्धीचा देव म्हणून पूजल्या जाणाऱ्या भगवान गणेशाच्या जन्माचा गौरव करण्यात आला. यावेळी शाळेच्या आवारात रंगीबेरंगी रांगोळ्या, फुलांची सजावट आणि रोषणाईने उत्सवी वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मिळून सजावट केली आणि सांस्कृतिक अभिमान प्रकट केला. सामूहिक प्रार्थना, आरती, मंत्रपुष्पांजली, गणपती अथर्वशीर्ष, भजनांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, भाषण व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे आपले कलागुण सादर केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी, उपमुख्याध्यापिका सदाफ शहाबाजकर तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदि मोठ्या संखेने उपस्थित होते.







