ईद ए मिलाद सणानिमित्त 22 ठिकाणी मिरवणुका
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
मुस्लीम समाजाचा पवित्र समजला जाणारा ई ए मिलाद हा सण रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा केला जाणार आहे. 171 ठिकाणी नमाज पठण केले जाणार असून, या सणानिमित्त 22 ठिकाणी मिरवणुका काढल्या जाणार आहेत. हा सण उत्साहात व आनंदात होत असताना कोणाताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
रसायनी, खोपोली, अलिबाग, वडखळ, पेण, नेरळ येथील दहा ठिकाणी 300 ते दीड हजार मुस्लीम बांधव नमाज पठण करणार आहेत. श्रीवर्धन, खालापूर, माथेरान, महाड शहर, नागोठणे, कर्जत, महाड तालुका, नेरळ, खोपोली, गोरेगाव, पेण, माणगाव, पाली या परिसरात मिरवणुका काढण्यात येणार आहेत.






