मेळाव्याच्या माध्यमातून हजारो हातांना काम
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शिक्षण असूनही रोजगार नसल्याने जिल्ह्यात बेकारीचे संकट उभे राहिले होते. शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांनी बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकाराने जिल्ह्यात 16 रोजगार मेळावे घेतले. या मेळाव्याच्या माध्यमातून एक हजार 200 बेरोजगारांना रोजगार प्राप्त झाला आहे. शेकापचे अतुल म्हात्रे यांच्यामुळे हजारो हातांना काम मिळाले आहे.
उच्च शिक्षित असलेले शेकापचे राज्य खजिनदार पेणमधील रहिवासी आहेत. आपल्या शिक्षणाचा फायदा येथील बेरोजगार तरुणांसाठी झाला पाहिजे, हा ध्यास त्यांनी कायमच ठेवला आहे. जिल्हयात अनेक तरुण आहेत. परंतु नोकरी नसल्याने बेकारीचे संकट त्यांच्यामध्ये निर्माण झाले आहे. हे संकट दुर करण्यासाठी शेकाप राज्य खजीनदार अतुल म्हात्रे यांनी पुढाकार घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण, पनवेल, उरण, कर्जत, रोहा या पाच तालुक्यांमध्ये आतापर्यंत त्यांनी 16 रोजगार मेळावे घेतले. या मेळाव्यात हजारो युवक युवतींनी सहभाग घेतला. या रोजगार मेळाव्यातून जागेवरच पात्र ठरणाऱ्या युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत एक हजार 200हून अधिक तरुणांच्या हाताला काम देण्याचे काम अतुल म्हात्रे यांनी केले आहे. त्यांच्यामुळे हजारो घरांना आर्थिक बळ मिळाले आहे.
शेकाक्ष आयोजित भव्य रोजगार मेळावा
शेतकरी कामगार पक्षाच्या तीने पनवेल येथे आयोजित भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाला मंगळवारी (दि.9) उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा उपक्रम उत्साहात आणि जल्लोषात यशस्वीरित्या पार पडला. या एक दिवसीय मेळावाच्या माध्यमातून तब्बल शंभरहून अधिक तरुणांना रोजगार देण्यात आला. यावेळी आनंद पाटील, प्रल्हाद पाटील, प्रकाश म्हात्रे, ॲड. रोशन पाटील, संजय सोनवणे, प्रशांत कांबळे, महेंद्र ठाकूर, राहुल बिराडे, विकी कदम तसेच अनेक बँकांचे व्यवस्थापक व कर्मचारी उपस्थित होते. ग्रामीण शहरी भागातील शिकलेल्या मुलांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे, ही भावना मनाशी ठेवून शेकापतर्फे रोजगार मेळावे आयोजित केले आहेत. अनेकजण रोजगाराचे आश्वासन देतात. परंतू आम्ही फक्त आश्वासन देत नाही, मुलांचे करिअर घडवितो, असा विश्वास शेकाप राज्य खजिनदार अतुल म्हात्रे यांनी व्यक्त केला.







