| मुंबई | प्रतिनिधी |
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने राज्यभरात पुन्हा हजेरी लावली आहे. शुक्रवार, दि. 12 सप्टेंबर रोजी सकाळपासूनही पावसाच्या सरी कोसळत आहेत. अशातच हवामान विभागाने पुढील आठवडाभर 17 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यातील 17 जिल्ह्यात 13 ते 18 सप्टेंबर या कालावधीत अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याच्या अंदाज वर्तवण्यात आली आहे.







