| सुतारवाडी | प्रतिनिधी |
कोलाडपासून सुतारवाडीपर्यंत रहदारीच्या रस्त्याची दुरवस्था झाली असताना आता ठिकठिकाणीच्या रस्त्याच्या साईडपट्ट्या सुद्धा धोक्याचा इशारा देत आहेत. वाळंजवाडी रस्त्याच्या वळणावर असलेली साईडपट्टी अत्यंत धोकेदायक झाली आहे. या साईडपट्टीला मोठा भगदाड पडले आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा ज्यावेळी सुतारवाडी येथे आले होते. त्यावेळी या साईडपट्ट्या व खड्डे बुजविले गेले होते. मात्र आता या साईडपट्ट्यांनी आणि खड्ड्याने उग्ररूप धारण केलेले दिसत आहे. नागरिकांची काहीच काळजी सार्वजनिक बांधकाम विभागाला नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. यावर्षी गणपती येऊन गेले सुद्धा तरी साईडपट्ट्या बुजवण्याचे धाडस सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविले नाही. एखादा मोठा अपघात झाल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभाग जागे होईल काय असा प्रश्न जनतेला पडलेला आहे.




