| रसायनी | प्रतिनिधी |
रिस येथील गुलमोहर सोसायटीमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. रिस गुलमोहर सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक 3 मध्ये राहणारे नितिन रामनाथ घरत हे आपल्या पेण येथील गावी गेले होते. त्यावेळी चोरांनी बंद दरवाजाचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे गळ्यातील सर, पान, कानातील रिंग, नथ आणि 1 व 2 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन असे 12 ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले आहे. नितिन घरत यांनी दिलेल्या तक्रारीवरून रसायनी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.







