| माथेरान | प्रतिनिधी |
महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक कल्याण संचालनालयाने कर्जत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर विद्यामंदिर माथेरान या शाळेच्या 17 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात 4100 रिले रेस या खेळात कर्जत तालुक्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या रिले संघात जान्हवी पुरबिया, वैष्णवी चौधरी, वैष्णवी सपकाळ, अंकिता बर्गे, समृद्धी आखाडे यांनी सहभाग घेतला होता. या सर्व खेळाडूंना उत्तम प्रशिक्षण निवृत्त प्राध्यापक सुनील शिंदे यांनी दिले होते. तसेच, शिक्षक संघपाल वाठोरे यांनी मार्गदर्शन केले. या सर्व खेळाडूंचे माजी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, विदुला गोसावी, माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, शिवाजी शिंदे, चंद्रकांत जाधव, प्रदीप घावरे, प्रवीण सकपाळ, राजेश चौधरी, ज्ञानेश्वर बागडे, भास्कर शिंदे, प्रकाश सुतार यांसह ग्रामस्थ, पालकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







