। पनवेल । वार्ताहर ।
नांदेड ते मुंबई असा खासगी बसने प्रवास करणाऱ्या एका तरुणाची सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग प्रवासादरम्यान चोरी झाली आहे. ज्या वेळी हा तरुण प्रवासी उतरला त्या वेळेस त्याला याची माहिती मिळाली. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. काही महिन्यांपूर्वीच कामोठे पोलिसांनी खासगी बसमध्ये प्रवाशांच्या पिशव्या चोरी करणाऱ्यांना अटक केली होती. त्यामुळे महामार्गावरील प्रवाशांची लूट थांबेल असे वाटत असताना एका प्रवाशाने मध्यरात्री कामोठे पोलीस ठाण्यात सकाळी लूट झाल्याची तक्रार दिली. 30 वर्षीय हा प्रवासी मुंबई येथील भायखळा येथे राहणारा आहे. कामोठे पोलिसांनी तक्रार नोंदविल्यानंतर संबंधित प्रवासी येत असलेल्या मार्गिकेवरील जेथे बस थांबली त्या थांब्यांवर बसमधून उतरलेल्या प्रवाशांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.







