। पनवेल । वार्ताहर ।
एका किरकोळ वादातून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना सेक्टर 8 येथे घडली आहे. तानाजी सुपेकर हा कामोठे सेक्टर 8 येथे राहत असून, तो नीरज हेअर सलून या दुकानात दाढी कटिंग साठी आला असता जुन्या किरकोळ वादातून नवनाथ ढाकणे याने मीरा ढाकणे, ओमकार ढाकणे आणि एक अनोळखी व्यक्तीच्या सहाय्याने तानाजी सुपेकर याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






