| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
प्रमोद देऊळकर यांनी पाली येथील जांभूळपाडा येथे जमीन खरेदीचा व्यवहार केला होता. त्यासाठी लागणारी 4 लाख रुपये रोख रक्कम आणि कॅनरा बँकेचे सही केलेले तीन कोरे चेक त्यांनी एका बॅगमध्ये ठेवले होते. बुधवारी (दि.24) दुपारच्या सुमारास देऊळकर पाली येथील विठ्ठल मंदिर परिसरातून जात असताना त्यांची बॅग हरवली. तातडीने त्यांनी पाली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपनिरीक्षक अनिल गोसावी आणि पोलीस शिपाई गौरव भापकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी चौकशी केली असता एका व्यक्तीने ती बॅग उचलून नेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याचा फोन नंबर मिळवला. त्या व्यक्तीला संपर्क साधून विचारपूस केली असता त्याने प्रामाणिकपणे बॅग सापडल्याचे सांगितले आणि ती पोलिसांकडे जमा केली.







