। आगरदांडा । प्रतिनिधी ।
मुरुड शहरातील प्रसिद्ध हनुमान हॉटेल मधील कामगार शीतला रामपाल प्रसाद (28) हा कामगार या हॉटेलमध्ये काम करीत होता. शनिवार दि.20 सप्टेंबर रोजी हा कामगार कोणालाही काहीही न सांगता निघून गेला होता. परंतु, बुधवारी (दि. 24) मुरुड कब्रस्थान जवळ त्याचा मृतदेह आढळून आला. एकदरा खाडीच्या पाण्यात मृतदेह दिसून आला आहे. त्यास तपासून मृत घोषित करण्यात आले आहे. या बाबतची माहिती नरेंद्र धीरेंद्र सिंग यांनी मुरुड पोलिसांना दिली आहे. या घटनेचा तपास मुरुड पोलीस करीत आहेत. सदरचा कामगार मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून, तो या हॉटेलमध्ये काम करीत होता.







