6 ऑक्टोबरला भूमीपुत्रांचा धडक मोर्चा
| उरण | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन घटिका जसजशी भरत आली आहे, तसे विमानतळ नामकरण हालचाली वेग धरत आहेत. नवी मुंबई विमानतळाला राष्ट्रीय नेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव दिले नाही, तर विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही. त्यामुळे विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे म्हणून येत्या 6 ऑक्टोबरला समस्त भूमीपुत्रांच्यावतीने एक धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी भूमिका घेण्यात आली आहे. याबाबत रविवारी कोपरखैराणे येथे बैठक पार पडली असून, याच बैठकीत 6 ऑक्टोबरच्या मोर्चाचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.







