| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ या संस्थेची 46 वी सर्वसाधारण सभा 20 सप्टेंबर रोजी सहयोग मंदिर सभागृह येथे पार पाडली. 1 मे 2025 ते 1 मे 2026 हे संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रौप्य महोत्सवी वर्ष म्हणून अंदाजपत्रात 50 टक्के वाढ करण्यात आली आहे. संस्थेचे नवीन सभागृह खरेदी करण्याचा मानस असल्याने सभागृह निधी संकलन मोहिमेबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित सभागृह निधी देणगीदाराचा सत्कार केला व उपस्थितांचे आभार मानून सभेची सांगता करण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी, सभासद यावेळी उपस्थित होते.







