। नागपूर । प्रतिनिधी ।
समृद्धी महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील दोघे मृत हे म्यानमार देशाचे असल्याची माहिती समोर आली आहे. ही कार मुंबईवरून जगन्नाथपुरीकडे जात होती.
हा अपघात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर मुंबईवरून नागपूरकडे जाणाऱ्या वाशिमच्या मालेगाव ते जऊळका दरम्यान कॉरिडरवर क्रमांक 232 वर झाला. कारचालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला असून रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठडे तोडून रस्त्याखाली गेली. तर दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातातील मृत म्यानमार या देशातील रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली.







