| मुंबई | प्रतिनिधी |
दिवाळीच्या निमित्ताने हिंदू आर्थिक नववर्षाची सुरुवात मानली जाते. या दिवशी करण्यात येत असलेली गुंतवणूक चांगली मानली जाते. काही गुंतवणूकदार या दिवशी दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करुन शेअर खरेदी करतात. त्यामुळे दिवाळीनिमित्त आयोजित केले जाणारे मुहूर्त ट्रेडिंग 21 ऑक्टोबरला दुपारी पावणेदोन ते पावणेतीन या दरम्यान होणार आहे. तर, त्यापूर्वी दीड ते पावणेदोन वाजेपर्यंत प्री-ओपन सत्र सुरु असणार आहे. या कालावधीत ट्रेडर्स ट्रेडिंगची तयारी करू शकतील. हे सत्र गुंतवणूकदारांसाठी शुभ सत्र मानले जाते. गुंतवणूकदार या ट्रेडिंगकडे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये समृद्धी आणि यश मिळवण्याची संधी म्हणून पाहतात. भारतीय शेअर बाजारात गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून मुहूर्त ट्रेडिंगचे सत्र आयोजित केले जाते. मुहूर्त ट्रेडिंगची सुरुवात बॉम्बे स्टॉक एक्सचेंजतर्फे 1957 साली पहिल्यांदा करण्यात आली होती.







