मुंबई | प्रतिनिधी |
एमपीएससी परीक्षेला बसण्यासाठी एका वर्षाची मुदत वाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे परीक्षा होऊ न शकल्याने अनेक विद्यार्थी परीक्षेला बसण्यापासून मुकणार होते. त्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. येत्या 19 नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे.