खोपोली | प्रतिनिधी |
छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो. हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी करण्यात येते. भारताच्या बिहार, झारखंड राज्यासह अनेक राज्यात हे व्रत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येत असताना खोपोलीत शहरातही वास्तव असलेल्या उत्तर भारतातील स्त्रियांनी मोठ्या उत्सवात छट पूजा मोठ्या उत्सवात पारंपरिक पध्दतीने 10 आँक्टोबर रोजी साजरी केल्याचे पाहायला मिळाले.
छट पूजा हा सूर्य देवाला समर्पित सण आहे, जो दिवाळीच्या 7 दिवसांनी साजरा केला जातो. हा देह आणि आत्मा शुद्धता, सत्य, अहिंसा, क्षमा आणि करुणा यांचा उत्सव आहे. कार्तिक महिन्यात बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या काही भागांमध्येही हा सण साजरा केला जातो. हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे. या दिवशी सूर्यदेवाची पूजा नदी, तलाव किंवा तलावासारख्या जलकुंभात केली जाते. असे म्हणतात की छठ सणात सूर्याची उपासना केल्याने छठ मातेला आनंद मिळतो आणि कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी येत असते म्हणून उत्तर भारतातील स्त्रिया हा उत्सव मोठ्या जल्लोषात व आनंदाने साजरी करीत असताना खोपोली शहरात ही उत्तर भारतीय वास्तव करणार्या स्त्रियांंनी पूजा अर्चा करून हा सण साजरा केला.
याप्रसंगी खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सुमन औसरमल, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, शिवसेना कर्जत खालापूर विधानसभा संपर्कप्रमुख पंकज पाटील, गटनेते – नगरसेवक तथा शिवसेना शहरप्रमुख सुनील पाटील, नगरसेवक अमोल जाधव, राजू गायकवाड, किशोर पानसरे, मनिष यादव, माधवी रिठे, निकिता पवार, प्रमिला सुर्वे, नितीन पवार, सामाजिक नेते हरेश काळे, तात्या रिठे, वकील यादव, उत्सवाचे अध्यक्ष विजय मोर्या, उपाध्यक्ष भरत अगरवाल, सचिव अजित वर्मा आदीसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.