। रसायनी । प्रतिनिधी ।
मोहोपाडा पंचशीलनगर येथील गजानन धोंडीराम पतंगे (36) या तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याने घराच्या छताला असलेल्या लोखंडी पाईपला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पतंगे याने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले असावे, असे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. या घटनेने पंचशील नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







