| नागोठणे | प्रतिनिधी |
नोगोठणे येथे बुधवारी (दि. 5) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नागोठणे कोळीवाडा येथील रस्त्यावर एसटी बस दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली.
नागोठण्यातील बस स्थानकातून रिलायन्स सर्कलकडे जाणाऱ्या पाली- नागोठणे या बसने दुचाकीला कट मारल्याने दुचाकीवर मागे बसलेले शांताराम दामा गायकवाड (77) रा. पाली (सुधागड) हे दुचाकीवर वरून खाली पडून झालेल्या अपघातात गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.







