। पनवेल । वार्ताहर ।
अनेक वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या खारघर येथील महापौर निवासाच्या इमारतीच्या कामासाठी मागवलेल्या वीज साहित्याची चोरी झाली आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या घटनेत एक लाख रुपयांची केबल व इतर साहित्य चोरण्यात आले आहे. खारघर येथील सेक्टर 21 येथील भूखंड क्रमांक 151 येथे पनवेल महापालिका महापौर निवास बांधत आहे. या महापौर निवासाचे काम अंतिम टप्प्यात आहे. 28 ते 31ऑक्टोबर या दरम्यान ही चोरी झाल्याची नोंद गरजितसिंग रहलोवालिया यांनी दिली आहे. या चोरीत 12 तांब्याच्या पट्या आणि 18 तारा चोरी झाल्याचे म्हटले आहे.







