बालकलाकाराची साकारली भूमिका
| खांब | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी या गावचा सुपुत्र अंश मनोज मरवडे या बालकाला झी मराठीवर सुप्रसिद्ध असलेल्या पारू मालिकेत बालकलाकार म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे.
अंश मरवडे हा मनोज दत्तात्रेय मरवडे व जुई मरवडे यांचा सुपुत्र असून, सध्या हा परिवार आपला कामधंदा व व्यवसायाच्या निमित्ताने ठाणे येथे वास्तव्यास आहे. अंशचे वडील मनोज मरवडे हे ठाणे येथील गोडबोले हॉस्पिटलमध्ये इन्चार्ज आहेत. तर, पारू मालिकेतील बालकलाकार निवड झालेला अंश हा सुलोचना देवी सिंघानिया स्कूल ठाणे या स्कूलमध्ये चौथ्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. अतिशय हुशार, दिसायला गोंडस, प्रत्येक बाबतीत हजरजबाबी व बालवयापासून अंगी असलेल्या नम्रतेमुळे अंशला पारू मालिकेतील बालकलाकार म्हणून गोपाळ या बालकाची भूमिका साकारण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे. दरम्यान, अंंशने भूमिका साकारलेल्या काही भागांचे प्रेक्षपण झी टिव्हीवर करण्यात आले आहे. तो करीत असलेली भूमिका रसिक प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून, अंश मरवडे याचे समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.







