| ठाणे | प्रतिनिधी |
ठाण्याची फ्रंटीयर एक्स्प्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शौर्या अंबुरेनं आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. यावेळी शौर्याने बहरीनमध्ये झालेल्या आशियाई युवा क्रिडा स्पर्धेत रुपेरी कामगिरी साधली आहे. या स्पर्धेत शौर्यानं आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी साधताना 100 मीटर हर्डल्स शर्यतीत 13:73 सेकंद अशी वेळ नोंदवत रौप्यपदक मिळवलं. विविध राष्ट्रीय स्पर्धांमध्ये छाप पाडणाऱ्या शौर्यानं आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आपली दखल घायला लावली आहे. शौर्या आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मैदानावर, ट्रॅकवर खडतर सराव करत होती. सरावाच्या बाबतीत तिनं कधीच टंगळमंगळ केली नाही. हे रौप्यपदक त्याचंच फळ आहे. भविष्यात देखील यापेक्षा सरस कामगिरीची तिच्याकडून अपेक्षा असल्याचं तिचे प्रशिक्षक अजित कुलकर्णी यांनी सांगितले.







