पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या
| रसायनी | प्रतिनिधी |
रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसरातील वडगाव येथील एस.बी.स्कॅफहोल्डींग कंपनीच्या आवारातून बुधवारी (दि.12) मध्यरात्रीच्या सुमारास चोरीची घटना घडली होती. या चोरीत सेन्टरींग कामासाठी लागणारे 57 हजार 90 रुपयांचे एकूण 77 ॲल्युमिनियमचे पॅनल चोरील गेले होते. याबाबत कंपनीचे एच.आर. मॅनेजर कृष्णा मिश्रा यांनी पोलीस ठाण्यात माहिती देताच वुयाळ येथील संजय म्हात्रे (32) याला ताब्यात घेतले असून आणखी दोन साथीदारांचा तपास सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय म्हात्रे व त्यांच्या दोन साथीदारांनी एस.बी.स्कॅफहोल्डींग इंडिया प्रा.लि. या कंपनीच्या गेट क्रमांक 4 ला लागून असलेल्या फटीतून आत प्रवेश केला. त्यानंतर ताडपत्री बांधून तयार केलेल्या ओपन शेडमध्ये प्रवेश करुन सेंटरींग कामासाठी लागणारे ॲल्यूमिनियमचे 57 हजार 90 रुपये किमतीचे 77 पॅनल कंपनी प्रशासनाच्या परवानगीशिवाय नेले. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी फॉरॅन्सिक टिमला कळिवण्यात आले आहे. रसायनीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शंनाखाली पोलीस सचिन चौरे अधिक तपास करीत आहेत.







