| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ दहिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रोहिणी निलेश विरले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गुरुवार, दि. 13 नोव्हेंबर रोजी रोजी उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. त्यावेळी रोहिणी विरले यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच मेघा मिसाळ आणि ग्रामसेवक यांनी रोहिणी विरले यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
दहिवली तर्फे वरेडी ग्रामपंचायतीत मेघा अमर मिसाळ या थेट सरपंच म्हणून काम पाहत असून, उपसरपंच सोनम गायकवाड काम पाहात होत्या. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्या रिक्त जागेवर निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी उपसरपंच म्हणून रोहिणी निलेश यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच मेघा मिसाळ, कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ, माजी उपसरपंच नरेश कालेकर, माजी उपसरपंच सोनम गायकवाड, सदस्य स्वाती विरले, माजी उपसरपंच यशवंत भवारे, विष्णू वाघमारे, अंकिता विरले, निलेश विरले, रवी मिसाळ, सुनील विरले, माजी उपसरपंच कैलास विरले, आत्माराम विरले, नारायण विरले, सचिन कडू, मनीष विरले, विनोद माळी, आत्माराम घोडविंदे, संजय कराळे, संतोष धुळे, अरुण माळी, अमोल गायकवाड, मयूर विरले, प्रदीप मिसाळ आदी उपस्थित होते.







