| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
अंबानींकडे चालक म्हणून नोकरीला लावतो असे आमिष दाखवून परदेशी नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दिनेश मनोहर कदम आणि कविता दिनेश कदम (तळोजा) यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात दि. 17 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
जेसन मरेंडा, तानिया मरेंडा आणि लिडन मरेंडा यांच्या ओळखीचे दिनेश मनोहर कदम आणि त्यांची पत्नी कविता दिनेश कदम यांनी जेसन याला अंबानीकडे चालक म्हणून नोकरीला लावतो असे आमिष दाखवले आणि त्याच्याकडून 60000 घेतले. त्यानंतर जेसन आणि तानिया यांच्याकडून पॅन कार्ड, आधार कार्ड घेऊन विजय सेल्स सीबीडी बेलापूर व वाशी सेक्टर 17 येथील मोबाईल शॉपमध्ये जाऊन मोबाईल, एसी, टीव्ही असे 4 लाख 87 हजार रुपये किमतीच्या वस्तू खरेदी केल्या. तसेच एना लीडन मरेंडा यांच्याकडून तीन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातल्या रिंग आणि चार ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी घेऊन सोनाराकडे गहाण ठेवली आणि आरोपींनी ते पैसे घेतले. मात्र, नोकरीला लावले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.







