| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल स्टेशन परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग आणि त्यामुळे निर्माण होणारी नागरिकांची होरपळ या सर्व समस्यांवर पनवेल वाहतूक विभागाने तातडीने कारवाई करत मोठा दिलासा दिला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या नेतृत्वाखाली 500 ते 600 वाहनक्षमता असलेला अस्थायी पार्किंग प्लॉट उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पार्किंगचे उद्घाटन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभागृहनेते परेश ठाकूर तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे परिसरातील वाहतुकीतील गोंधळातील मोठी घट झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी वाय टी देशमुख, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.







