‘कोरस’विरोधात ग्रामस्थांचा ठिय्या
| चणेरा | प्रतिनिधी |
धाटाव औद्योगिक क्षेत्रातील प्रख्यात कारखाना कोरस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील तीन स्टाफ कामगारांना कंपनी व्यवस्थापकाने टर्मिनेट केले होते. तसेच, गेल्या अनेक दिवसांपासून स्टाफ कामगारांचं कामबंद आंदोलन सुरू होतं. त्याच अनुषंगाने स्टाफ कामगारांच्या न्याय्य हक्काच्या लढ्यासाठी रोहा तालुक्यातील शेकडो ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवर भूमीपुत्रांसाठी बुधवारी (दि. 19) रोजी आंदोलन छेडण्यात आले होते.
या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक नागरिक, महिला, युवक, सर्वपक्षीय नेते आणि सामाजिक संस्थांचा प्रचंड अभूतपूर्व पाठिंबा मिळाला. मात्र, कंपनी प्रशासन, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक सर्वपक्षीय पदाधिकारी यांच्यातील झालेल्या बैठकीमध्ये कंपनी व्यवस्थापकाने समाधानकारक उत्तर न दिल्यामुळे हे बैठक निष्फळ ठरल्याने कामगारांच्या गोटामध्ये असंतोषाचा भडका उडाला. दरम्यान, कामगारांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू, असा निर्धार जाहीर केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून स्टाफ कामगारांचा कामबंद आंदोलन सुरू होतं, त्याच अनुषंगाने गेटवर स्थानिकांच्या न्याय्य हक्कासाठी आंदोलन छेडण्यात आलं होतं . यावेळी रोहा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रसाद गोकुळे, पोलीस निरीक्षक मारुती पाटील तसेच कंपनीचे अधिकारी यांनी यांच्यासोबत तब्बल दोन वेळा मध्यस्थीचे प्रयत्न करून कंपनीच्या एमडी साबू यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता त्यांनी सांगितले की, या बैठकीत कंपनी प्रशासनाने 75 कामगारांना घेण्याची तयारी दर्शवली, तसेच टर्मिनेट केलेल्या 3 पैकी 2 जणांना पुन्हा घेण्याचा शब्द दिला. मात्र, तिसऱ्या कामगाराबाबत 1015 दिवसांत निर्णय घेऊ, अशी टाळाटाळीची भूमिका घेतल्याने कामगार संतप्त झाले. कामगारांनी कंपनीचा निर्णय फोल ठरवत स्पष्टपणे जाहीर केले. परंतु, चर्चा निष्फळ ठरली. तसेच मधुकर पाटील यांच्या फोनवरूनदेखील खा. सुनील तटकरे यांनी साबू यांच्याशी संवाद साधला; परंतु त्यांनादेखील साबू यांनी घेण्याचा शब्द दिलेला नाही, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कंपनी प्रशासनाने घेण्याबाबतची रचना त्यानंतर आयोजित सर्वपक्षीय बैठकदेखील निष्पन्न न ठरल्याने कामगारांमध्ये कंपनी प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. भूमीपुत्रांचा न्याय नाकारला जाणार नाही; तिन्ही टर्मिनेट कामगारांना पुनर्नियुक्ती मिळालीच पाहिजे. या आंदोलनात स्थानिक नागरिक व कामगारांच्या कुटुंबिय आले होते.
यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी, सामाजिक, धाटाव विभागातील शेकडो महिला व तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. तर महिलांनी काढलेल्या हंबरड्यामुळे वातावरण क्षणाक्षणाला भावनिक बनत गेले. वर्षानुवर्षे आम्ही या कंपनीसाठी घाम गाळला आणि आता न्यायच नाही? हा कोणता विकास? असा सवाल कुटुंबियांनी कंपनीवर टीका केली, तर येणाऱ्या काही दिवसात कंपनी प्रशासनाने हा प्रश्न सोडवला नाही तर आणखी हा वाद चिघळण्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे.







