| रसायनी | प्रतिनिधी |
कौटुंबिक वादातून विवाहित महिलेला मारहाण झाल्याची घटना चांभार्ली येथे घडली असून, दि. 26 जून 2019 ते 14 नोव्हेंबर 2025 दरम्यान विवाहित महिला फिर्यादी रा. चांभार्ली, पो. मोहोपाडा, खालापूर यांचे आरोपी पती यांच्यासोबत सन 2019 साली लग्न झाल्यानंतर तक्रार केलेल्या तारखेपर्यंत फिर्यादी विवाहित महिलेशी सतत घरगुती कारणावरून वादविवाद करून त्रास देत आहे. आरोपी पती वारंवार फिर्यादी यांना मारहाण करत असल्याबद्दल रसायनी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







