| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठण्यातील भारतीय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या वेलशेत येथील शैक्षणिक संकुलातील फार्मसी कॉलेजच्या वतीने 64 व्या नॅशनल फार्मसी सप्ताहाच्या निमित्ताने नागोठणे शहरात जनजागृती रॅली काढून लसीकरण संदर्भात जनजागृती करण्यात आली. या लसीकरण मोहिमेत फार्मसीचे महत्व पटवून देण्यात आले. या रॅलीची सुरुवात नागोठणे गावची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिर प्रांगणात नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नरेश थळकर यांच्या हस्ते करण्यात आली. या जनजागृती रॅलीत प्राचार्य डॉ. आशिष पगारीया, डॉ. समीर पवार, अनघा सामंत, प्रा. जयेंद्र राणे, प्रा. सुरज मोकल, राजेश सुतार, भारत कामथे, अथर्व पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.







