| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील आक्षी-साखर येथील जिल्हा परिषद शाळेसाठी सढळ हस्ते मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचा ऋणनिर्देश कार्यक्रम सोहळा बुधवारी (दि.19) आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अलिबाग पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी, विस्तार अधिकारी कृष्णा पिंगळा व केंद्र प्रमुख तथा विस्तार अधिकारी प्राची ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली साखर शाळेत पार पडला.
अलिबाग तालुक्यातील साखर शाळेला दानशूर व्यक्तींनी महत्वाचे योगदान दिले आहे. त्यामध्ये मनोज हारे, प्रफुल्ल बानकर, रणजीत गण, पांडुरंग पेरेकर, शाम गण, उल्लेश नाखवा, गोरख गोतकर, दत्ता नाखवा, हरिश्चंद्र बामजी, निलेश चौलकर, नागेश पेरेकर, वासुदेव नाखवा व इतर दानशूर व्यक्तींनी देणगी देऊन शाळेचा कायापालट करण्यासाठी हातभार लावला आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजस तांडेल, उपाध्यक्ष रेश्मा भुकवार, सदस्य हरेश्वर गोतकर, देवदत्त मुंढे, अंकिता भुकवार, अश्विनी गण, भावना जगू, करिश्मा भुकवार, अपर्णा नर, रिमा गुरव, संजना नर्बेकर, मनिषा गुरव, कमला तांडेल, सर्व पालक वर्ग तसेच मुख्याध्यापक राजेंद्र पाटील व उपशिक्षिका स्मिता चिखले यांनी खूप मेहनत घेतली.
या कार्यक्रमासाठी नागाव केंद्राच्या केंद्र प्रमुख तथा अलिबाग बीट विस्तार अधिकारी प्राची ठाकूर, आक्षी सरपंच रश्मी पाटील, उपसरपंच आनंद बुरांडे, सदस्या निरजा नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्या आश्लेषा नाईक, ग्रामसेवक प्रसाद गोंधळी तसेच सर्व देणगीदार व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक उपस्थित होते.







