| उरण | प्रतिनिधी |
उरण महाविद्यालयातील वाणिज्य व अकाउंटिंग फायनान्स विभागाच्या वतीने महाविद्यालयात सॅप व डिजिटल मार्केटिंग या विषयावर उद्बोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. ग्लोबल आयओटी स्कूल, नवी मुंबई या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या अभ्यासवर्गात मा.अस्मा पटेल, आणि चार्टर अकाउंटंट पिंकी मॅडम व मा.यश खैरे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, औद्योगिक रोजगारात सॅपची भूमिका व कार्य, डिजिटल मार्केटिंग इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. बदलत्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजंट करियर संधीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मान्यवरांनी सांगितले. त्याचबरोबर विविध ॲपच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर कसा करावा तसेच डिजिटल मार्केटिंग कसे करावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय डॉ. पी.आर. कारुळकर यांनी केला. पाहुण्यांचे स्वागत जेष्ठ प्रा.व्हि एस. इंदुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थितांचे आभार प्रा. रियाज पठाण यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आय.क्यु.ए.सी समन्वयक डॉ. अरुण चव्हाण, प्रा. विनिता तांडेल, प्रा. पुजा गुप्ता, प्रा. हन्नत शेख, प्रा. दिपु यादव यांनी मेहनत घेतली.







