| सुतारवाडी | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या आकर्षक दिनदर्शिकाचे प्रकाशन नुकतेच सुतारवाडी येथे प्रसिद्धी प्रमुख हरिश्चंद्र महाडिक यांच्या निवासस्थानी करण्यात आले. रायगड जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष गणेश महाडिक, माणगाव तळा अध्यक्ष मंगेश जाधव, रोहा तालुका महिला अध्यक्ष संगीता महाडिक, विजय देशमाने तसेच समाज बांधवांच्या उपस्थितीत दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.







