| चिरनेर | प्रतिनिधी |
मोठेभोम येथील संतोष पाटील यांचे सुपुत्र दिवंगत सिद्धेश (सोन्या) संतोष पाटील या क्रिकेटपट्टूचा नववा स्मृतीदिन मोठेभोम येथे साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सोन्या स्पोर्ट्स टीमच्या सौजन्याने मोठेभोम येथील मुख्य रस्त्याच्या बसथांब्यावर प्रवाशांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रसंगी उपस्थित असलेल्या किशोर केणी, महेंद्र ठाकूर, सुभाष पाटील, महेश पाटील, सुमित पाटील, प्रसाद पाटील, बंट्या पाटील, सुशांत पाटील यांहस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. या मुख्य थांब्यावर आसन व्यवस्था करण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण असून, या आसन व्यवस्थेमुळे सिद्धेश (सोन्या) पाटील याची स्मृती लोकांच्या कायम लक्षात राहील, असे गौरवोद्गाार उपस्थित मान्यवरांनी काढले.







