| उरण | प्रतिनिधी |
कस्टम हाऊस एजन्टच्या (सीएचए) न्याय्य हक्कासाठी लढणाऱ्या व मराठी स्थानिक भूमीपुत्रांची संघटना असलेल्या न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी जपत देशातील थलेसेमिया, अपघातग्रस्त रुग्ण व दुर्गम आजारावरील शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या रक्ताची गरज लक्षात घेता रविवार, दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन (उरण) येथे तेरणा ब्लड बँक नेरुळ यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक रक्तदात्यांनी न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी सदस्यांशी संपर्क साधून नाव नोंदणी करून रक्तदान शिबिरात सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान करावे, असे आवाहन न्हावा शेवा सीएचए आधार सामाजिक संस्थेतर्फे करण्यात आले आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी रूपेश भगत 9619395292, श्याम गावंड 9664034347, हनुमान म्हात्रे 9867886480 यांच्याशी संपर्क साधावा.







