। नवीन पनवेल । प्रतिनिधी ।
पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चैन खेचून चोरटे मोटारसायकलवरून पसार झाले. याप्रकरणी 26 नोव्हेंबर रोजी तळोजा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शिवपता सरोज या तळोजा, फेस टू येथे राहात असून, 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास पायी चालण्यासाठी फेस टू तळोजा येथे गेल्या होत्या. सातच्या सुमारास बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर पायी चालत असताना पाठीमागून काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दोन इसम आले. त्यातील एकाने यांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचली आणि ते पळून गेले. सोन्याची चैन खेचल्याने सरोज यांच्या गळ्याला खरचटले असून, त्या रस्त्यावर खाली पडल्या व त्यांना दुखापत झाली.







