| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
19 वर्षांखालील आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. कर्णधारपद मुंबईचा खेळाडू आयुष म्हात्रेकडे सोपवले आहे. 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीचा समावेश संघात झाला आहे. आशियाई क्रिकेट परिषदेकडून आता 19 वर्षांखालील आशिया कप 2025 स्पर्धा आयोजित केला जाणार आहे. ही स्पर्धा 12 डिसेंबरपासून दुबईत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी भारताच्या युवा संघाची घोषणा झाली आहे. भारत-पाकिस्तान एकाच गटात 8 संघात खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी साखळी फेरीत भारतीय संघ अ गटात आहे. या गटात पाकिस्तानचा संघही आहे. तसेच अद्याप दोन संघ पात्र ठरण्याची प्रतिक्षा आहे. ब गटात बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान असून त्यांच्यासह आणखी एक पात्रता मिळवणारा संघ असेल. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध 14 डिसेंबर रोजी रविवारी सामना खेळणार आहे. उपकर्णधारपद विहान मल्होत्राकडे देण्यात आले आहे. तो देखील एक उदयोन्मुख खेळाडू असून यापूर्वीही अनेकदा 19 वर्षांखालील संघाकडून चांगली कामगिरी केली आहे. आशिया कप स्पर्धेसाठी भारताचा 19 वर्षांखालील संघः आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), युवराज गोहिल, कनिष्क चौहान, खिलन ए. पटेल, नमन पुष्पक, डी दिपेश, हेनिल पटेल, किशन कुमार सिंग, उद्धव मोहन, ऍरॉन जॉर्जराखीव खेळाडू: राहुल कुमार, हेमचुदेशन जे, बी.के. किशोर, आदित्य रावत संघात असणार आहेत.







