| पनवेल | प्रतिनिधी |
नकली पुस्तकांची विक्री करणाऱ्या पुस्तक विक्रेत्यास खांदेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून 125 पुस्तकांच्या प्रती जप्त करण्यात आल्या. नवीन पनवेल येथील संविधान महोत्सवात जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाच्या नकली प्रतीची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर खांदेश्वर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी विक्रेता मनमोहन मिश्रा (रा. खांदा कॉलनी) याला ताब्यात घेण्यात आले.







