| चौल | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संतोष काशिनाथ घरत यांच्या मातोश्री सुशिला घरत यांचे बुधवारी, (दि. 3) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने बागमळा येथील निवासस्थानी निधन झाले. निधनसमयी त्या 83 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी निवासस्थानी येऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सुशिला घरत यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर बागमळा येथील स्मशानभूमीत रात्री दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी सुशिला घरत यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार, दि. 12 डिसेंबर रोजी होणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.







