| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा (दि.30) नोव्हेंबर रोजी आरसीएफ कुरुळ येथे संपन्न झाल्या. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष आहे. या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय ट्रायथोलॉनपट्टू डॉ. महेंद्र पवार उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. वैभव भगत यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेमध्ये क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि कॅरम अशा मैदानी आणि इनडोअर असे दोन्ही प्रकारचे खेळले गेले होते. या कार्यक्रमास संस्थेचे सर्व सदस्य व माजी अध्यक्ष डॉ. दोषी, डॉ. संदेश पाटील, डॉ. गणेश गवळी, डॉ. मयूर कल्याणी, डॉ. रवी म्हात्रे, डॉ. आशिष भगत, डॉ. अनघा भगत, डॉ. राजेंद्र मोकल, डॉ. मकरंद आठवले उपस्थित होते. कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. ओंकार पाटील, डॉ. अमेय केळकर, डॉ. अमित बेनकर, डॉ. वैजेश पाटील, डॉ. सनली नाईक, डॉ. निशिकांत ठोंबरे, डॉ भूषण शेळके, डॉ. पल्लवी शेळके, डॉ. आदेश मोकाल, डॉ. समीर धाटावकर, डॉ. अभिराज पाटील, डॉ. रश्मी गंभीर, डॉ. प्रांजली पाटील यांनी खूप मेहनत घेतली होती.







