। रसायनी । प्रतिनिधी ।
मोहोपाडा आळी आंबिवली येथील अल्पवयीन मुलीचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याची घटना घडली आहे. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीच्या आईंने तक्रार दाखल केली आहे. त्यांची 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेली असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. याबाबत रसायनी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, रसायनी पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनुसया ढोणे या करीत आहेत.







