| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत एज्युकेशन सोसायटीचे इंग्लिश मिडीयम स्कूलचे वार्षिक क्रीडा स्पर्धेला सुरुवात करण्यात आली आहे. क्रीडा ज्योत प्रज्वलित करून या स्पर्धेला सुरुवात झाली असून, नगरपरिषदेच्या मैदानावर ही स्पर्धा खेळविले जात आहे.
कर्जत इंग्लिश मिडीयम स्कूल चे वार्षिक क्रीडा स्पर्धा शहरातील आमराई भागातील नगरपरिषद मैदानावर भरवल्या आहेत. या वार्षिक क्रीडा स्पर्धेत प्रामुख्यानं मैदानी खेळ खेळविले जात असून, त्यात कब्बडी, खो-खो, लांब उडी, उंच उडी, धावण्याच्या स्पर्धा, चमचा लिंबू स्पर्धा, लंगडी, व्हालीबॉल ह्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्याचे चार ग्रुप तयार करण्यात आले असून, गट निहाय स्पर्धा खेळवल्या जात आहेत. सेकंडरी आणि प्रायमरी अशा सत्र निहाय या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा ज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. यावेळी प्रवीण गांगल, मदन परमार, सतिश पिंपरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपमा चौधरी तसेच सुनील बोरसे, क्रीडा स्पर्धा शिक्षिका प्रीती म्हात्रे आणि सर्व शिक्षक यांनी क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नियोजना केले होते.







