| सुतारवाडी | प्रतिनिधी |
श्रीमत पद्मनाभाचार्य अमृत नाथ स्वामी शाखा दत्त मंदिर पुगाव यांच्या सौजन्याने ग्रामस्थ मंडळ सुतारवाडी, श्री दत्त क्रीडा समाजसेवा मंडळ सुतारवाडी यांच्यावतीने याही वर्षी श्री दत्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. उत्सवाचे हे 40 वे वर्षे होते. गुरुवारी (दि.4) ते शुक्रवार (दि.5) पर्यंत श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी अभंग स्नान, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण, ज्ञानेश्वरी सांगता, भोजन, प्राथमिक शाळा सुतारवाडी व सुतारवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम, दत्त जन्माचे कीर्तन, प्रमुख पाहुण्यांचा सत्कार, किर्तन, जागरण, पालखी सोहळा, काल्याचे किर्तन असे कार्यक्रम दोन दिवस आयोजित केले होते.







