| मुंबई | प्रतिनिधी |
भारताने ज्युनियर महिला हॉकी वर्ल्ड कपच्या सलामीच्या लढतीत नामिबियाचा 13-0 गोल फरकाने धुव्वा उडविला. भारताकडून हीना बानो आणि कनिका सिवाच यांनी गोलची हॅट्रिक साजरी केली. हीनाने 35 व्या व 45 व्या मिनिटाला गोल केले, तर कनिकाने 12 व्या, 30 व्या व 45 व्या मिनिटाला गोल केले. तसेच साक्षी राणा (10व्या, 23 व्या मिनिटाला) हिने दोन गोल केले, तर बिनीमा धन (14 व्या), सोनम (14 व्या), साक्षी शुक्ला (27 व्या), इशिका (36 व्या) आणि मनीषा (60 व्या) यांनी प्रत्येकी एक गोल करून हिंदुस्थानच्या धडाकेबाज विजयात आपला वाटा उचलला. या दणदणीत विजयासह हिंदुस्थानने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळवले. सामन्याच्या पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताने केवळ चार मिनिटांत चार गोल करून दणक्यात सुरुवात केली. साक्षीने रिव्हर्स फ्लिकवर शानदार सुरुवात केली.







