| भाकरवड | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतच्या हद्दीत गुरुवारी (दि.4) एका कोल्ह्याला अज्ञात वाहनाने उडवले. यात कोल्हा जखमी झाला होता. याबाबाची माहिती सर्पमित्र सतीश रामदास म्हात्रे (आवेटी-अलिबाग) यांना आशीर्वाद वसंत म्हात्रे यांनी फोन करून दिली. नंतर त्याला सुखरूप जागी नेऊन ठेवले. तसेच याबाबत सांबरी गावातील जीवन पाटील (वनरक्षक) यांना भ्रमणध्वनीद्वारे कल्पना दिली असता त्यांनी तात्काळ वन विभाग अधिकारी (वडखळ पेण) यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या टीमला प्राचारण केले. तासाभरात वनरक्षक प्रशांत सोनवणे, वनपाल शंकर पारधी आणि नितीन शिंदे हजर झाले. त्यानंतर सह्याद्री वन्यजीवरक्षक अर्थ सामायिक संस्था रोहा रायगड सागर दहिमबेकर आणि टीम गाडी घेऊन आले. त्यांनी कोल्ह्यास सुखरूप गाडीत ठेवून पुढील उपचारासाठी रोहा येथे नेले. एका वन्य प्राण्याचा जीव वाचवल्याने वनपाल अधिकारी यांनी जीवन पाटील, सतीश म्हात्रे (सर्पमित्र) आशीर्वाद म्हात्रे, गणेश पाटील आदींचे वनविभाग वडखल, रोहा सह्याद्री वन्यजीवरक्षक सामाजिक संस्था, रोहा-रायगड यांनी आभार मानले.







