। पालघर । प्रतिनिधी ।
पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्यात काळिमा फासणारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका पोलीस हवलदाराने तक्रारी अर्जाच्या चौकशीसाठी आलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आपल्या एका तक्रारी अर्जाच्या चौकशी संदर्भात कासा पोलीस ठाण्यात आली होती. याच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या शरद भोगाडे नावाच्या पोलीस हवालदाराने चौकशीच्या बहाण्याने महिलेला पोलीस ठाण्यामागे असलेल्या पोलीस लाईनच्या खोलीत नेले. त्याच ठिकाणी त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या संतापजनक प्रकारानंतर पीडित महिलेने धाडस दाखवत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.






