। रसायनी । प्रतिनिधी ।
रसायनीतील लाडिवली गावात भाड्याने राहणाऱ्या संतोष करण वढीया (30) हा दारूच्या नशेत खोलीच्या पोटमाळ्यावरील लाकडी शिडीवरून पाय घसरून खाली पडल्याने त्याच्या डोक्याच्या मागील बाजूस दुखापत झाल्याने त्यास उपचारासाठी चौक ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डाॅक्टरांनी तपासून त्यास मयत घोषित केले. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करीत आहेत.







