| माणगाव | प्रतिनिधी |
द. ग. तटकरे महाविद्यालय, माणगाव-रायगड येथे आधुनिक हिंदी साहित्याच्या प्रवाहातील मूल्य परंपरा, सामाजिक परिवर्तन आणि नव्या आव्हानांचा वेध घेणारी राष्ट्रीय परिषद दि.13 डिसेंबर रोजी भरणार आहे. प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (भारत सरकार), महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी, मुंबई आणि माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद होत असून, हिंदी साहित्य क्षेत्रातील अभ्यासकांसाठी हा एक महत्त्वपूर्ण बौद्धिक मेळावा ठरणार आहे.
परिषदेच्या उद्घाटन सत्राला डॉ. शीतला प्रसाद दुबे, डॉ. अनिल सिंह, प्रो. डॉ. संतोष मोटवानी यांसारखे राष्ट्रीय ख्यातीचे विद्वान उपस्थित राहणार आहेत. तसेच माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. राजीव साबळे, कृष्णा भाई गांधी, प्रा. बाळासाहेब कोकाटे, प्रा. अनिल काळे, प्रा. सुभाष जाधव, प्रा. मोहसिन खान, प्रा. विद्या शिंदे, प्रा. सुभाष पवार, प्रा. ईश्वर पवार, प्रा. युवराज मुळे, डॉ. देवीदास बामणे, डॉ. के. के. शर्मा, डॉ. वंदन जाधव, प्रा. आर. गोपाळकृष्णन, डॉ. एस. ए. मंजुनाथ या मान्यवरांची उपस्थिती परिषदेचे वैचारिक पर्व अधिक समृद्ध करणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. बी. एम. खामकर, सचिन निंबाळकर, डॉ. जे. आर. पांडेय यांनी सर्व साहित्यप्रेमी, विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना सहभागाचे आवाहन केले आहे.






