| मुंबई | प्रतिनिधी |
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यांनी यासंदर्भात आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना पत्र लिहिलं आहे. आपल्या या पत्रामध्ये आपण लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे. अण्णा हजारे लोकायुक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण करणार आहेत. 30 जानेवारी 2026 पासून राळेगणसिद्धी येथील यादवबाबा मंदिरामध्ये अण्णा हजारे उपोषणाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान, अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यामुळे आता सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे अण्णा हजारे यांच्या या मागणीवर आता सरकार नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.







