अधिवेशनात आ.बाबासाहेब देशमुखांनी केली कृषी भवनची मागणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते. अलिबाग, रोहा व मुरूड तालुक्यासह अनेक तालुक्यात शेतकरी प्रगतशील आहेत. त्यामुळे विविध योजनांसाठी येथील शेतकऱ्यांना कृषीभवनाची आवश्यकता आहे, ही बाब शेकापचे आ. बाबासाहेब देशमुख यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. अलिबाग, रोहा व मुरूड तालुक्यासाठी कृषी भवन मंजूर करून भवनाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी अधिवेशात त्यांनी केली. तसेच सांगोला, पंढरपुर येेथेही कृषी भवन उभारण्याची कार्यवाही करण्यात यावी असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी शेकाप आक्रमक झाले.
रायगड जिल्हयामध्ये 93 हजार हेक्टरपेक्षा अधिक भातशेतीचे क्षेत्र आहे. भात पिकांसह आंबा तसेच कडधान्याची लागवड रायगड जिल्हयात मोठ्या प्रमाणात केली जाते. नवनवीन प्रयोग शेतकरी करतात. मात्र जिल्ह्यामध्ये कृषी भवन नसल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येत नाही. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा व मुरूड तालुक्यांसह अनेक तालुक्यात प्रगतशील शेतकरी असून उत्पादन वाढीसाठी त्यांचे योगदान कायमच महत्वपूर्ण राहिले आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी भवनची आवश्यकता असल्याची बाब आ. बाबासाहेब देशमुख यांननी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. तसेच राज्यातील विविध ठिकाणी कृषी विभागांतर्गत व इतर संबंधित कामे करण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सांगोला, पंढरपुर तालुके हे कृषी प्रधान आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांना कामासाठी कृषी भवनची आवश्यकता आहे. सांगोला व पंढरपूर तालुक्यासाठी कृषी भवन मंजूर करून भवनाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करण्याची कार्यवाही शासनाने करावी अशी मागणीदेखील त्यांनी केली.
शासकीय निवासी इमारतीची मागणी
अलिबाग हे रायगड जिल्ह्याचे मुख्यालय आहे. तालुक्यातील महूसल विभागांतर्गत विविध शासकीय कर्मचाऱ्यांकरीता निवासी इमारतीची सोय नाही. निवासी उपजिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, व इतर कर्मचारी यांच्यासाठी निवासी इमारत बांधण्यात यावी. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासी इमारतीची गरज आहे. सांगोला येथे शासकिय जमीन उपलब्ध आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार, व इतर कर्मचारी यांच्यासाठी निवासी इमारतीचे बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाने निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
सहकार संकूल उभारण्याची मागणी
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सहकार वाढत आहे. जिल्ह्यातील जिल्हा बँकेबरोबरच विविध कार्यकारी संस्था, सहकारी दुध संघ हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेशी जोडणाऱ्या वाहिन्या आहेत. विविध संस्थाचे लेखा परिक्षण, सहकार न्यायालय, विभागीय सह निबंधक कार्यालय, जिल्हा सहनिबंधक, उपसह निबंधक, या सहकार क्षेत्रातील कार्यालयाशी अनेक दैनंदिन कामे होत असतात. सांगोल्यातही मोठ्या प्रमाणात सहकार क्षेत्र कार्यरत आहे. यासाठी सहकार क्षेत्रातील सर्व विभाग एकाच ठिकाणी असावेत, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. त्यामुळे रायगडसह सांगोल्यामध्ये सहकार संकुलची इमारत उभारण्यात यावी अशी मागणी शेकाप आ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.







